स्त्री-पुरुष नात्यामध्ये 'ति'चं म्हणणं परखडपणे मांडणारं नाटक 'तिला काही सांगायचय'

 

स्त्री-पुरुषाचं... विशेषतः नवरा-बायकोचं नातं... माणसाला भावनिक, मानसिक आणि शारीरिक सुख देणारं नातं ! नातं सर्वोच्च सुखाची समाधानाची अनुभूती देणार... पण तितकच हळुवार आणि नाजूक! या नात्यातला खेळकरपणा, हळुवारपणा जपायचा असेल तर प्रेम, विश्वास आणि एकमेकांसाठी आदर हा हवाच पण या नात्यांमध्ये संशय, मालकी हक्क या गोष्टी आल्या की नात्यातल्या 'ती'ला काय सांगायचे ते राहूनच जातं. स्त्री-पुरुष नात्यामध्ये 'ति'चं म्हणणं परखडपणे मांडणारं  नाटक म्हणजे 'तिला काही सांगायचय'.

पुण्यात राहणारा अमेरिकन कंपनीत काम करणारा यश आणि एका एनजीओमध्ये काम करणारी, स्त्री सक्षमीकरणा संदर्भात आपली ठाम भूमिका असणारी मिताली या नवरा बायकोची ही गोष्ट. आपल्या लग्नाच्या ॲनिवरसरी च्या आदल्या रात्री ही दोघे आपल्या लग्नाबद्दल, आपल्या नात्या बद्दल चर्चा करायला सुरुवात करतात आणि या चर्चेतून उलगडत जातात एकमेकांच्या आयुष्याबद्दलची वेगवेगळी सिक्रेट्स!

पितृसत्ताक मानसिकतेतून आलेली, यश ची, स्वतःची अशी काही ठाम मते आहेत. आपल्या जोडीदाराने कसं असलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कुणाशी मैत्री केली पाहिजे याबद्दलच्या त्याच्या अनेक भूमिका आहेत. एनिवर्सरी चा रात्री सुरू झालेल्या या चर्चेतून ही अशी अनेक गुपिते बाहेर येऊ लागतात. यशच्या अशा भूमिकेवर 'तिला' म्हणजेच मितालीला काही सांगायचंय आणि ते ती  शेवटी नाटकामध्ये ठामपणे मांडते.

संशयी, Possessive, तरीही मिताली वर प्रेम करणारा नवरा अस्ताद काळे न छान उभा केलाय छान उभा केलाय. तेजश्री प्रधान ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत मितालीच्या भूमिकेच्या अनेक छटा, प्रेक्षकांसमोर अत्यंत बारकाईने उभ्या करते.लेखक दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांना 'तिला काही सांगायचय' मधून त्यांना जे काही सांगायचं ते नक्कीच विचार करायला लावणार आहे.

पण स्त्री-पुरुष विरुद्ध पितृसत्ताक व्यवस्था याविषयी काही सांगण्याच्या ऐवजी संपूर्ण नाटकच स्त्री विरुद्ध पुरुष किंवा एनजीओ विरुद्ध कॉर्पोरेट या एकांगी मार्गाने का जातं हे फक्त या नाटका मध्ये नीटसं उलगडत नाही. नेपथ्य, वेशभूषा, संगीत या सर्वच अंगांनी नाटकाची मांडणी तशी परिपूर्ण आहे.

(परिक्षण: असीम त्रिभुवन - फक्त मिलेनिअल मराठीसाठी!) 

परिक्षणाचा विडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा … 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.